जामनेर (प्रतिनिधी) : आमदार सत्यजीत तांबे हे मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी सातत्याने आपल्या मतदारसंघचा दौरा करत असतात. सध्या आ.सत्यजीत तांबे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या माध्यमातून शहरातील विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकारी यांची भेट घेत असून त्यांच्या आजच्या दौऱ्यास उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी त्यांनी पारोळा, जामनेर आणि जळगाव शहर या ठिकाणी विविध भेटीगाठी घेतल्या. व सामाजिक, शैक्षणिक, वकील बांधव तसेच तसेच इतर मान्यवरांची भेट घेऊन आपुलकीचा संवाद साधला.
दौर्यादरम्यान आमदार तांबे यांनी पारोळा येथील डॉ. अर्चना विसावे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे जाहीर झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल आमदार तांबे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, “शिक्षक समाज घडविण्याचे महान कार्य करतात. शिक्षकांचा सन्मान आणि त्यांचे प्रश्न सोडवणे ही माझी जबाबदारी आहे. शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”
यानंतर आमदार तांबे यांनी ॲड. पियुष नरेंद्र पाटील (B. Com, LLB) यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या वकिलांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगत तांबे यांनी वकील बांधवांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात भक्कम लढा देण्याचे आश्वासन दिले.“वकिल बांधवांचे संरक्षण, त्यांच्या हक्कांसाठीचा लढा आणि समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,”असे आ. तांबे म्हणाले.
*व्यापक मतदारसंघात जनतेशी आपुलकी -*
नाशिक पदवीधर मतदारसंघ हा फार व्यापक आहे. ५ जिल्हे ५४ तालुके व ४ हजार हून अधिक गावांचा यात समावेश आहे. याच मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न सुरु असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यापासून किमान तीन लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. इतका प्रवास करूनही थकण्यापेक्षा मला ऊर्जाच मिळत असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबेंनी याप्रसंगी व्यक्त केली आहे
***************************************
आमदार तांबेंची जळगांव दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी सांत्वन भेट –
1) कै. लीलाबाई मुरलीधरसा दाणेज – भाटेवाडी, पारोळा
2) कै. मीराबाई दशरथ पाटील – जामनेर
3) उत्तरकार्य – कै.गोदावरी वासुदेव पाटील – जळगाव
***************************************
Leave a Reply