जामनेर(प्रतिनिधी)दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट योगकलेचे दर्शन घडवीत उपस्थितांना थक्क करणाऱ्या व जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा रोवणाऱ्या डॉ. शरयू जितेंद्र विसपुते यांच्या हस्ते १ मे, महाराष्ट्र दिनी, जिनिअस इंटरनॅशनल स्कूल मध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कांतीलाल जैन, प्रमुख अतिथी डॉ. शरयू विसपुते, सन्माननीय अतिथी डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पल्लवी सोनवणे, डॉ. मनोज पाटील, डॉ . नामदेव पाटील, शाळेचे अध्यक्ष श्री. भीमराव पाटील, संस्थाचालक श्री. पंढरी पाटील, डॉ.श्री. नंदलाल पाटील, सौ. शिल्पा नितीन पाटील, सौ. रूपाली पाटील, शाळेचे प्राचार्य डॉ.श्री. दीपक गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत डॉ. शरयू यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘सिनियर बी’ गटात पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांमध्ये इतर २१ आशियाई देशांतील स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हे यश संपादन केले.
‘भविष्यातील ध्येय निश्चित करण्याचे शाळा हे प्रभावी व्यासपीठ असून, लहान वयातच तुमच्यातील सुप्त गुण हेरुन, भविष्यातील संधीसाठी योग्य दिशेने वाटचाल करण्याचे व काहीतरी करून दाखविण्याचे हेच योग्य वय असल्याचे ठाम मत डॉ. शरयू विसपुते यांनी मांडले.’ जिनिअस शाळेतील वार्षिक बक्षिस वितरण समारंभात विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
Leave a Reply