जामनेर (प्रतिनिधी )जामनेर येथील श्रीमती वैशाली विलास चौधरी प्रकाश नगर, जामनेर भाजपा तालुका सरचिटणीस महिला मोर्चा, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा प्रदेश तेली महासंघ,अध्यक्षा राणी लक्ष्मीबाई महिला सेवा सह.संस्था.मर्यादित जामनेर यांची अखिल भारतीय बळीराजा संघटन या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आज निवड झाल्याचे पत्र देण्यात आले या पत्रात श्रीमती चौधरी यांना असलेल्या बहुजन समाजाच्या प्रश्नाची जान तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची आ.भा. बळीराजा संघटन या सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दिलेली संघटनेची जबाबदारी निष्ठेने पूर्ण करतील अशी सदिच्छा संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती डक पाटील यांनी पाठवलेल्या निवड पत्रात दिली आहे.
Leave a Reply