जामनेर (प्रतिनिधी )-येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ कौतिकराव खोडके हे सेवानिवृत्त झाल्याने पाटील सर यांनी त्यांचे निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.डॉक्टर खोडके भराडी येथील राहणाऱे असून अमृत यात्री डी.डी. पाटील हे भिलखेडा येथे वास्तव्यास होते.डॉक्टर खोडके हे सात जुलै 1988 पासून पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली कापूसवाडी, लोहारा , गोंडखेड, जामठी, वाकोद अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. त्यांच्या सेवा कार्याची दखल घेत डी.डी. पाटील यांनी त्यांचा गौरव केला.डी. डी .पाटील हे साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची दखल घेत अमृत यात्री डी.डी. पाटील त्यांचा सन्मान करीत असतात. डॉक्टर खोडके हे प्रामाणिक पणे सेवा देणारे अधिकारी म्हणून परिचित होते.
Leave a Reply