अनिल थत्तेचं खोटं थेट कोर्टात फेल – गिरीश महाजन यांचा विजय, खडसेंसह विरोधकांचं तोंड काळं!

मुंबई:/महाजनांच्या कार्यकर्त्यांच्या आणि लाखो समर्थकांच्या रोषाचा स्फोट अखेर न्यायालयात स्पष्ट झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गिरीश महाजन यांच्यावर बदनामीकारक आरोप करणाऱ्या अनिल थत्तेच्या सर्व व्हिडिओ डिलीट करण्याचे आदेश देत या प्रकरणाला पूर्णविराम दिला. ही केवळ कायदेशीर विजय नाही, तर गिरीश महाजन यांच्या असामान्य राजकीय प्रामाणिकतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा ठोस पुरावा आहे.

*राजकारणाची बदनामीसाठी थत्तेचा वापर – खडसेंचा “सत्तेचा सूड” फसला!*

या प्रकरणामागे केवळ एक विकृत युट्यूबर नव्हता, तर सत्तेतून बाहेर झाल्यानंतरही भाजपविरोधात सूडाचे राजकारण करणारे एकनाथ खडसे यांचाही अप्रत्यक्ष हात होता, हे आता जनतेलाही समजले आहे. खडसे यांनी पक्षावर टीका करताना अनेकदा वैयक्तिक स्तरावर घसरले. अनिल थत्तेचा वापर करून त्यांनी महाजन यांच्यावर टीकेची जहरी मोहीम उघडली होती.

पण न्यायालयाने ती मोहीम अक्षरश: जमीनदोस्त केली आहे – आणि खडसेंच्या “सत्तेच्या आठवणी”तून चाललेलं राजकारण आता तोंडघशी पडलं आहे.

*गिरीश महाजन – जनतेचा नेता, विकासाचं चेहरा*

महाजन हे केवळ नावालाच मंत्री नाहीत, तर त्यांचा ठसा ग्रामीण विकास, जलसंपदा आणि शेतकरी हिताच्या प्रत्येक योजनांवर उमटलेला आहे. त्यांच्या यशस्वी कामगिरीपुढे विरोधकांच्या आरोपांची किंमत शून्य आहे. न्यायालयीन निर्णयाने तेच अधोरेखित केलं आहे.
खडसे आणि थत्तेसारख्या मंडळींचं राजकारण म्हणजे खाजगी द्वेषातून उभं राहिलेलं कुंपण. पण भाजप कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेने दाखवलेला पाठिंबा हीच खरी न्याययंत्रणेला प्रेरणा ठरली. न्यायालयाने ही गोष्ट ओळखूनच ठाम निर्णय दिला.
गिरीश महाजन यांचं प्रामाणिक, जनहितवादी नेतृत्व आज नव्याने सिद्ध झालं आहे. थत्तेचं विकृत अपप्रचार आणि खडसेंसारख्या अपयशी राजकारण्यांच्या कांगाव्यांना लोकशाहीने आणि न्यायव्यवस्थेने ठोकर दिली आहे. हे केवळ एक प्रकरण नव्हतं – ही होती “प्रामाणिक नेतृत्वाची न्यायालयीन पुनर्स्थापना!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *