लोकन्यायालयातुन१२९५ प्रकरणे निकाली. एकुण ५८,२३,४९५ रूपये ची तडजोडी अंती वसुली

जामनेर(प्रल्हाद सोनवणे )आज दिनांक १४ डिसेंबर २०२४, रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेकडिल आदेशान्वये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करणेत आलेले होते. त्या अनुषंगाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, क. स्तर जामनेर येथे आयोजीत लोकन्यायालय मोठया उत्साहात पार पाडले. सदर लोक न्यायालयात न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांत एकुण ९० प्रकरण निकाली निघाली. तर, वादपुर्व प्रकरणांतील एकुण १२०५ प्रकरणे निकाली निघाली. अशी जामनेर न्यायालयातुन एकत्र १२९५ प्रकरणे निकाली निघाली. सदर लोकन्यायालयातुन एकुण ५८,२३,४९५ रूपये ची तडजोडी अंती वसुली झाली.

सदर लोकन्यायालयास पॅनल प्रमुख म्हणुन दिवाणी न्यायाधीश तसेच तालुका विधी सेवा समिती जामनेर चे अध्यक्ष, मा.श्री. दि.न. चामले साहेब यांनी कामकाज पाहिले. तर, पॅनल सदस्य म्हणुन अॅड. तेजस्वीनी पाटील यांनी कामकाज पाहिले. सदर लोकन्यायालयास जामनेर न्यायालयाचे सह. दिवाणी न्यायाधीश बी.एम. काळे व दुसरे सह दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. सुर्यवंशी हे देखिल हजर होते. सदर लोकन्यायालयाचे उद्घाटन करणेपुर्वी न्यायाधीश .दि.न. चामले व बी.एम. काळे यांनी उपस्थित पक्षकार यांना विधी सेवेबाबत माहिती दिली. दरम्यान मध्यस्थी व लोकन्यायालयाचे महत्व पटवुन सांगणेत आले. तसेच विधी सेवा बाबत सेवा विषयी माहिती देण्यात आली. दरम्यान ज्येष्ठ नागरीक कायदा, कौटुंबिक वाद, दिवाणी स्वरूपाचे वाद, फौजदारी केसेस, भारतीय राज्यघटना, नविन तीन कायदे, बालकांचे हक्क व अधिकार, पोक्सो अॅक्ट, ग्राहकांचे हक्क व संरक्षण कायदा, या विविध विषयांवर माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमांस मा. वकिल सघ जामनेर यांनी सहभाग नोंदविला. वकिल संघाचे अध्यक्ष,बी.एम. चौधरी, सचिव एम.बी. पाटिल, सरकारी वकिल कृतिका भट व अनिल डी . सारस्वत , सौ. आर.आर. चव्हाण , हे देखिल हजर होते.

आज रोजी सदर लोकन्यायालयाचे तडजोडीतुन एकुण ०४ जोडपी त्यांचे सासरी नांदावयास गेली, तर या न्यायालयातील प्रलंबित दिवाणी वाद असलेली सण २००६ चा सुमारे १८ वर्ष जुना दिवाणी दावा आज रोजी आपसांत समझोत्याने निकाली निघाला. सदर दाव्यातील वाद मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथ पर्यंत गेलेला होता. सदर दाव्यात तडजोड करण्यासाठी वादितर्फे अॅड. व्हि.एस. पाटील यांनी तर प्रतिवादीतर्फे अॅड. राजु बी. पाटील यांनी सहकार्य केले. तसेच इतर चार कौटुंबीक वाद असलेल्या प्रकरणांत अॅड. एस.आर.पाटील, अॅड. बी.एस.पवार, अॅड. व्ही. जे. धनगर, अॅड.डि.बी. बोरसे, अॅड. के.पी. बारी, अॅड. डि.जी. पारळकर, अॅड.पी.व्ही.फासे, अॅड.के.बी. डुबे, अॅड. देवा जाधव, यांनी तडजोड यशस्वी घडवुन आणणेत महत्वाची भुमिका पार पाडली. तसेच सदर लोकन्यायालयास अॅड. बी.एन. बावस्कर, अॅड.ए.पी. डोल्हारे, अॅड.एस.एम. साठे, अॅड. के. बी. राजपुत, अॅड. संदीप पाटिल, अॅड वाघ, अॅड. चौधरी, अॅड. गोतमारे, तसेच मा. वकिल संघाचे सर्व विधीज्ञ हजर होते. सदर लोकन्यायालयास बँक कर्मचारी, बी.एस.एन.एल., पंचायत समिती जामनेर, पोलिस कर्मचारी, सर्व न्यायालयीन कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *