जामनेर (प्रतिनिधी):राणी दानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद (ता. जामनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.९ सप्टेंबर रोजी वाकोद येथे घेण्यात आलेल्या श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी विद्यालयाची विद्यार्थिनी मिताली संदीप काळे हिने प्रथम क्रमांक पटकावून ठसा उमटविला.
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मितालीने “भारत : काल, आज आणि उद्या” या विषयावर प्रभावी वकृत्व सादर करून परीक्षकांची मने जिंकली. या गटात राज्यभरातून तब्बल २४ स्पर्धक सहभागी झाले होते.
विजेत्या मितालीचा सत्कार इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे श्रद्धेय आधारस्तंभ तथा माजी खासदार बाबूजी ईश्वरलालजी जैन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, संचालिका निकिता जैन, ज्येष्ठ संचालक श्रीराम नाना महाजन, संचालक के.व्ही. महाजन, माजी मुख्याध्यापक जे. पी. पाटील, मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, उपप्राचार्य प्रा.डी.झेड.गायकवाड, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, प्रा.जी. जी.अत्तरदे आदी.मान्यवर उपस्थित होते.
मितालीला स्पर्धेत रोख ५००१ रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशामागे सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा प्रा.सविता महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
————————————
Leave a Reply