
Oplus_131072
जामनेर(प्रतिनिधी)आरोग्य विभाग जामनेर व इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह जामनेर येथे जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पोलीस व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम.एम कासार तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी कैलास काळे उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्थितांना आरोग्य तपासणीचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले आभार इंडियन डेंटल असोसिएशन आशिष महाजन यांनी मानले.
मौखिक आरोग्य तपासणी सह बीपी. शुगर व सतरा प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्यात.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.मोनिका जाधव, डॉ. राहुल वाणी, डॉ.वैभव पाटील, डॉ.किरण धनगर, डॉ. विजयसिंह पाटील, डॉ. प्रशांत सरताळे, डॉक्टर दिलीप गाढे, डॉ. नितीन गुरव, डॉ. शुभम सरताळे, जया खरे, थायता वळवी, अदमान तांवोळी,तेजस्विनी पाटील, त्र्यंबक तंव्वर,प्रदीप पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply