जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव कामकुचराई केल्यास कडक कारवाईचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा

जामनेर (प्रतिनिधी)जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जामनेर तालुक्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया तसेच साधनांद्वारे उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.सन २०२४- २०२५ या वर्षात जामनेर तालुक्यात एकूण ११९५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

पुरुष नसबंदी ही स्त्री शस्त्रक्रियेच्या पेक्षा सुलभ व सोपी असल्याने अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी “पुरुष नसबंदी साठी लाभार्थींचे मत परिवर्तन करावे असे “डॉ. भायेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत,डॉ.कोमल देसले,डॉ.मोहित जोहरे,डॉ संदीप कुमावत, डॉ शारीक कादरी, डॉ सागर पाटील, डॉ कोमल देसले,डॉ.दानिश खान,डॉ. हर्षल भटकर व सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका उपस्थित होते.


कार्यक्रमाचे रवींद्र सूत्रसंचालन रविंद्र सुर्यवंशी केले तर डॉ. मोहित जोहरे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी बशीर पिंजारी,गोपाल पाटील,त्र्यंबक तव्वर,सोनल पाटील,प्रदीप पाटील,सुयोग महाजन,सलील पटेल,आशा कुयटे,शिवली देशमुख,प्रतिभा चौधरी,अनुराधा कल्याणकर गजाजन माळी,सुधाकर माळी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *