जामनेर (प्रतिनिधी)आपल्या *सप्तपुट ललितकला भवन खिरोदा* साठी
*अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब*
जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे सुरू असलेल्या
४५ व्या मान्सून आर्ट शो २०२५ या प्रदर्शनात
सहभागी असलेल्या
अतुल राठोड जी. डी. आर्ट पेंटिंग विभाग
या विद्यार्थ्यांच्या ” गर्भ ” या कलाकृतीस
*सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे” पुरस्कार
आणि
*योगसुत्र वे ऑफ लाईफ अकादमी – नटखट पुरस्कार*
असे एक नव्हे तर दोन पुरस्कार प्राप्त झाले.
प्रसिद्ध अशा जहांगीर आर्ट गॅलरी येथिल प्रदर्शनात आपल्या ग्रामिण भागातील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांस एका पेक्षा दोन पुरस्कार एकाच कलाकृतीस मिळणे हे आपल्या कला भवनासाठी आणि खान्देशसाठी अभिमानास्पद आहे. अतुल यांची कलाकृती आशय गर्भ आणि विशिष्ट तंत्रशैली मुळे प्रदर्शनात विशेष उल्लेखनीय ठरत आहे. आपला सर्वांचा गौरव वाढवणारी बाब आहे. या लौकिक प्राप्त पुरस्कार निमित्त
*संस्थाप्रमुख मा. श्री.शिरीषदादा चौधरी , अध्यक्ष मा. कुमारदादा चौधरी ,
उपाध्यक्ष मा. अजितदादा पाटील,
सचिव मा. प्रभातदादा चौधरी कला भवनाचे प्राचार्य अतुल मालखेडे व शिक्षक, शिक्षकेतरवृंद* यांनी अतुल राठोड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Leave a Reply